Posts

आदिवासी दिन निम्मित

आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏 🌿 *आदिवासी बांधव आणि आरोग्य सेवा — एक जिव्हाळ्याचं नातं 🌿* “आदिवासी समाज म्हणजे केवळ जंगलात राहणारा समाज नव्हे; तो निसर्गाशी नातं जपणारा, कष्टाला आपला धर्म मानणारा आणि आपल्या संस्कृतीची मुळं घट्ट धरून ठेवणारा समाज आहे.” आदिवासी बांधव आणि आपली आरोग्य सेवा यांचं नातं खरंच खूप मोठं, जिव्हाळ्याचं आणि संवेदनशील आहे. ‘आदिवासी’ या शब्दाचा साधा अर्थ ‘आदि + वासी’ — या भूमीचा प्राचीन रहिवासी असा घेतला जातो. हजारो वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या समाजाने जंगल, डोंगर, नदी, वनस्पती आणि पर्यावरणाशी एक अतूट नातं निर्माण केलं आहे. आदिवासी समाजातील बांधव अतिशय राकट, धाडसी, कष्टाळू, स्वाभिमानी आणि निसर्गाशी घट्ट जोडलेले असतात. पूर्वी आधुनिक वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध नसताना, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वनस्पती, मुळे, पाने आणि पारंपरिक ज्ञानाचा उपयोग अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर केला जात असे. हे ज्ञान पिढ्यान्‌पिढ्या अनुभवातून पुढे आले. परंतु काळ बदलला... निसर्गाचा समतोल बिघडला, जंगलांवर विविध प्रकारचे अतिक्रमण व दबाव वाढला, पारंपरि...

*माझी इमेज..*

*इमेज माझी...*      शीर्षक वाचताच अनेकांना स्वतःविषयी नक्कीच जाणीव झाली असेल. कारण प्रत्येक माणसाची एक "इमेज" असते. पण ती चेहऱ्याने, शरीराने किंवा परिस्थितीने ठरत नसते. ती घडते संघर्षाने, संस्काराने, विचाराने आणि कर्माने. माझा जन्म ६ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला. जन्मताच मी शारीरिकदृष्ट्या अपंग होतो. आयुष्याने पहिल्या श्वासापासूनच माझी परीक्षा सुरू केली होती. पण नियतीची सर्वात मोठी वेदना मला वयाच्या पाचव्या वर्षी मिळाली. माझा धाकटा भाऊ अवघा बारा दिवसांचा असताना सर्पदंशामुळे माझ्या आईचे निधन झाले. आईच्या मायेचा स्पर्श, तिच्या कुशीत डोकं ठेवून रडण्याचा आधार, तिच्या हातचा घास आणि तिच्या प्रेमाची ऊब मला कधीच अनुभवता आली नाही. दोन वर्षांनी वडिलांनी आमच्या पालनपोषणासाठी दुसरा विवाह केला. संसार पुढे चालला, पण माझ्या आयुष्यातील "आई" ही जागा मात्र कायम रिकामीच राहिली. आजही कितीही मोठा झालो तरी मनाच्या एका कोपऱ्यात आईच्या मायेची ओढ तशीच आहे. अनेकदा मनात एकच प्रश्न उमटतो—"जर माझी आई आज असती, तर माझं आयुष्य किती वेगळं असतं?" अपंगत्वामुळे शिक्षण हा माझ्यासाठी रोजचा संघर्ष ...

अति पापी, दुष्ट लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा अधिक का असते?. वास्तव्य दर्शी उदाहरण.💖

Image
     मला एक नेहमी प्रश्न पडतो! कि वाममार्गी,वाईट रित्या धन कमविणारे लोक सुखी का असतात??आणि प्रामाणिकपणे कस्ट करणारे नेहमीच पाप पुण्याचा विचार करून सदवर्तन मार्गे धन कमविणारे यांच्या वाट्याला दुःख का येतें!  हा प्रश्न तुम्हां आम्हांला नेहमीच पडत असेल बरोबर का?आणि तस पाहायला गेलें तर आपल्या वर्तमान काळात अशी अनेक उदाहरणं देता येतील नव्हे तर घडत असतात.!वाम मार्गे धन कमविणारे कसं आनंदी आणि मोठया रुबाबात स्वतः मिरवत असतात हे आपण अवतीभवती पाहत असतोच.. हे निसर्ग चक्र नुसार आपण सहज पडताळून पाहू शकतो आणि अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, जे लोक पाप करून, खोटे बोलून, फसवणूक करून आणि चांगल्या लोकांना मूर्ख बनवून पैसे कमवतात, ते अधिक श्रीमंत आणि आनंदी जीवन जगतात. यांचे उत्तम उदाहरण आज काळ घडत असलेल्या घटना.जे लोक लुटमार, शोषण, अप्रामाणिकपणा करून आणि खऱ्या मालाऐवजी बनावट वस्तू पाठवून पैसे कमवतात ते प्रामाणिक लोकांपेक्षा अधिक सुखी आणि समृद्ध असतात. पौराणिक मान्यतेनुसार, एकदा देवी पार्वतीने हाच प्रश्न भगवान शंकरांना विचारला होता. एकेकाळी भगवान शंकर आणि...

*💖माझी कर्मभूमी वरपडी गाव --एक निसर्ग रम्य ठिकाण.💖

Image
   आजोबाचा डोंगर हा शहापूर जिल्ह्यातील डेहणे गावाजवळ आहे. बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध हा डोंगर आहे. येथे गडावर वाल्मिकी ऋषींची समाधी आहे.येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिम्मित मोठी जत्रा भरते. आजोबाच्या डोंगराची ३,००० फुट उभी भिंत प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान आहे.  या डोंगराच्या अगदी 3010 फूट खाली वसलेले हे छोटसं  वरपडी गाव.      रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध हा डोंगर आहे. आजोबाच्या डोंगराची ३,००० फुट उभी भिंत टेकर्स व ग्रीहारोहकासाठी एक आव्हान आहे. , अशा या पवित्र भूमीत वसलेल्या हे आमचे छोटंसं वरपडी गाव.@ गावाची, नावाप्रमांणे अगदीच वर म्हणजे जिल्हाच्या सीमा समाप्तीला उंचवटी भागाला टेकून असलेलं गाव..महाराष्ट्र राज्यमधील ठाणे जिल्हातील आदिवासी बहुल शहापूर तालुक्या मधील एक छोटस अगदी 35/40 घरांचे हे एक साधं गाव. लोकसंख्या अंदाजे 200-250.तस गाव म्हणायला येवढी लोकसंख्या नाहीच आहे.        अशा या गावात आमचे पूर्व हे 1967 साली आले. तस आमचे मूळ गाव किन्हवली मधील खरिवली या गावाचे आमचे प...

अस्नोली आरोग्य उपकेंद्र गाव-एक अदभूत रसायन.

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठया ठाणे जिल्ह्याचे विभाजन 1 ऑगस्ट 2014 रोजी होऊन ठाणे  -पालघर जिल्ह्या तयार झालेनंतर जिल्ह्या बदली नुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हवली अंतर्गत उपकेंद्र अस्नोली येथे जून 2017 ला आरोग्य सेवक या पदावर हजर झालो.       माझ्या शैक्षणिक करियर मध्ये वयाच्या 28 वर्ष पर्यंत कोणत्याही भागाशी जास्त माझा प्रवास संबंध आलाच नाही. आधीच आर्थिक परिस्थिती बिकट त्यातून आई लहानपणी वयाच्या 5 व्या वर्षी देवाघरी आम्हां तिघा भावांना सोडून गेलेली, त्यातून जन्मत अपंगपणा. आशा बिकट वेळी मोलमजुरी करून, खडी मशीन वर  खडी भरणे, शेजारील काळू नदीत रेती उत्तखणन करणे, आमच्या भाषेत रेती काढणे, वडिलांना शेती कामात मदत करणे, डोंगरदऱ्यातून कारवी डोक्यावर आणून बागायत शेतीस विकणे,  प्लम्बर, गवंडी, वायरमन अशी कितीतरी, व वडिलांचा कारवी विक्री व्यवसाय असल्याने त्यावेळी मदत करणे व स्वतः डोंगरदऱ्यातून आणून विकणे कामा केली असल्याने बाहेर जास्त फिरती नसल्याने आजूबाजूला शहापूर तालुक्यातील कोणता गाव याची जास्त माहिती संपर्क न आल्याने माहिती...

जीवन एक अद्भुत कला

         आपणास मिळालेले जीवन हे इतर प्राणी मात्रा पेक्षा खूपच अमूल्य आहे.त्याचा योग्य उपभोग घेणे हेच मानवाच्या हाती आहे...                      दया ,छमा , शांती हेच जीवनाचे सूत्र आहे...