अस्नोली आरोग्य उपकेंद्र गाव-एक अदभूत रसायन.

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठया ठाणे जिल्ह्याचे विभाजन 1 ऑगस्ट 2014 रोजी होऊन ठाणे  -पालघर जिल्ह्या तयार झालेनंतर जिल्ह्या बदली नुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हवली अंतर्गत उपकेंद्र अस्नोली येथे जून 2017 ला आरोग्य सेवक या पदावर हजर झालो.
      माझ्या शैक्षणिक करियर मध्ये वयाच्या 28 वर्ष पर्यंत कोणत्याही भागाशी जास्त माझा प्रवास संबंध आलाच नाही. आधीच आर्थिक परिस्थिती बिकट त्यातून आई लहानपणी वयाच्या 5 व्या वर्षी देवाघरी आम्हां तिघा भावांना सोडून गेलेली, त्यातून जन्मत अपंगपणा. आशा बिकट वेळी मोलमजुरी करून, खडी मशीन वर  खडी भरणे, शेजारील काळू नदीत रेती उत्तखणन करणे, आमच्या भाषेत रेती काढणे, वडिलांना शेती कामात मदत करणे, डोंगरदऱ्यातून कारवी डोक्यावर आणून बागायत शेतीस विकणे,  प्लम्बर, गवंडी, वायरमन अशी कितीतरी, व वडिलांचा कारवी विक्री व्यवसाय असल्याने त्यावेळी मदत करणे व स्वतः डोंगरदऱ्यातून आणून विकणे कामा केली असल्याने बाहेर जास्त फिरती नसल्याने आजूबाजूला शहापूर तालुक्यातील कोणता गाव याची जास्त माहिती संपर्क न आल्याने माहिती नव्हती.
पर्यायाने सन  मे 2005 व्या वर्षी माझं लग्न श्रीम माधुरी हिच्याशी होऊन मे 2006 मध्ये आम्हांला एक गोंडस, मधुर गुणी कन्यारत्न प्राप्त झाले आणि त्याचा पुढच्याच वर्षी जानेवारी 2007 ला मी ठाणे जिल्ह्यात जिल्ह्या परिषद ठाणे येतें आरोग्य विभागात भरती अंतर्गत माझी आरोग्य सेवक  पदावर सन जानेवारी 2007 ला  सध्याच्या पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातील उपकेंद्र खानिवाडे या अतिशय उच्चभ्रू लोकसंख्या च्या भागात माझी प्रथम नेमणूक झाली.
 त्या नंतर जवळ जवळ मी 10/11 वर्ष एकाच प्राथमिक आरोग्य केंद्र भाताने या phc मध्ये सलग 10/11 वर्ष भागात आरोग्य सेवा दिली. त्यामुळे माझं शहापूर तालुक्यातील बऱ्याच गावाचा संपर्क झालाच नाही किंवा मला नांवेही माहिती नव्हतीच म्हणा.
तदनंतर जिल्ह्या बदली नुसार मी पुन्हा ठाणे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हवली अंतर्गत उपकेंद्र अस्नोली येथे आरोग्य सेवक पदावर जून 2017 ला हजर झालो.
ज्यावेळी मी ऑर्डर घेतली त्यावेळी मला हे गाव परिचितच नव्हते. ना गावाची माहिती, ना ठिकाण, ना कोणाची ओळख, ना भौगोलीक, सामाजिक परिस्थितीची माहिती.आशा वेळी या ठिकाणी हजर कसं व्हायचं, कोणकोणत्या अडचणी येतील या भीतीनेच मन बैचन झालं होते. कारण आधीच अपंग असल्याने यात आणखी भर पडली होती. त्यावेळी ला अनेकांनी अस्नोली गाव व परिसरातील लोक अतिशय वाईट, राजकारणी, व कोणत्याही सरकारी नोकरदार यांस त्रास देतात असं समक्ष सांगितलं होते त्यामुळे आणखीच मनाची चंचलता वाढली होती. पण आता ऑर्डर तर दिली आहे त्यामुळे हजर होणे आवश्यक आहे व माझा माझ्या कामाप्रती असलेला विस्वास मला तू जा, घाबरू नको, सर्वं व्यवस्थित होईल असं माझं मन मला सांगत होते.
आणि 16 जून 2017 ला मी ऑर्डर घेऊन उपकेंद्र अस्नोली या ठिकाणी माझ्या पत्नीला सोबत घेऊन हजर झालो.
पहिल्याच दिवशी लसीकरण सत्र आयोजित केलेले होते. त्यावेळी anm श्रीम देसले या हजर झाल्या होत्या. पण त्यांनी कोण नवीन आरोग्य सेवक आलेत याची विचारपुसही जास्त केली नाही 😊
पण आपण वसई तालुका मध्ये आदिवासी बहुल भागात दिलेले इमानइतबारे आरोग्य सेवेचा अनुभव व आधीच लहान आईविना पोरका असल्यामुळे माझ मन खूप भावनिक आणि समजूतदार होते. त्यामुळे मी निर्धास्त होतो.
 आरोग्य सेवा देता देता एक एक दिवस,महिना, वर्ष जाता आज मी खरंच अस्नोली करांना खूप खूप धन्यवाद देतो.
या 2017 ते 2025 आरोग्य सेवा काळातील प्रत्येक दिवस मला अस्नोलीकरानी व परिसरातील शेळवली (बांगर), शिळगाव व शिलपाडा या भागातील सर्वं अबालवृद्ध, तरुण तुर्क, राजकीय, सामाजिक लोकांनी त्यांच बरोबर तेथील आशा सेविका, bf, Anm, मदतनिस, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, अंगणवाडी पर्यवेशिका, सर्वं प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा मधील शिक्षकवृंद, अस्नोली, शील, शेळवळी गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, इतर शासकीय विभाग मधील अधिकारी कर्मचारी,गावातील प्रतिष्ठित लोक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर, सर्वं आरोग्य कर्मचारी यांनी उत्तम साथ देऊन मला आरोग्य विषयक कामात भरभरून मदत केली बद्दल मी सर्वाना खूप खूप धन्यवाद देतो व सर्वाचा खूप ऋणी आहे व राहील.
अस्नोलीकर म्हटलं कि एक धडाडता, धगधगता कार्यकरताच म्हणावा लागेल. गावातील लोकसंख्या तीन साडेतीन हजाराच्या आसपास, गावातील भौगोलिक परिस्थिती निसर्गनुरूप, गावात मुबलक पाणी, शेजारीच धरण, त्यामुळे शेतीस पूरक परिस्थिती, गावातील शैक्षणिक गुणवत्ता उत्तम, गावात अनेक शासकीय नोकरदार मंडळी, रिटायर्ड मंडळी, आर्थिक सुब्बता,प्रतिष्ठित राजकीय लोकप्रतिनिधी व वातावरण. या आणि आशा विविध गोष्टीमुले गावात सर्व बाबतीत उत्तम वातावरण आणि तितकेच नवीन नोकरदार मंडळीना आव्हाणात्मक परिस्थिती.
पण मला या ठिकाणी काम करताना अस्नोली करानी दिलेल्या प्रेम, आपुलकी, विस्वास या बाबी खरंच खूप काही सांगून जातात.
उपकेंद्र परिसरातील अस्नोलीकर, शिलकर व शेळवळी करांनी दिलेले प्रेम आणि माझ्या कामावर दाखविलेला विस्वास हाच माझा सन्मान आहे. मला पुढील कार्यसाठी नेहमीच यातून प्रोत्साहन मिळेल.
पुढील काळात नवीन रुजू होणाऱ्या शासकीय नोकरदार यांनी आवर्जून या बाबी लक्षात घेऊन उत्तम सेवा द्यावी अन्यथा हा उपकेंद्र एरिया नक्कीच त्याची जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असा हा अस्नोली गाव  व शेजारील गाव आहे.
धन्यवाद 🙏🙏
(टीप - हा लेख मी प्रथमच लिहीत आहे. यामागे माझं वसई तालुक्यातील सहकारी मार्गदर्शक डॉ अमित सुमन तुकाराम पाटिल MBBS MD बालरोग तज्ज्ञ यांचे मी वाचलेलं विचार प्रबोधन आहे.)
पुनःश्च धन्यवाद 🙏
श्री हरिश्चंद्र कृष्णा हरड आरोग्य सेवक उपकेंद्र अस्नोली प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हवली ता शहापूर जिल्हा परिषद ठाणे 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

आदिवासी दिन निम्मित

*माझी इमेज..*

*💖माझी कर्मभूमी वरपडी गाव --एक निसर्ग रम्य ठिकाण.💖